आयुष्यात सकारात्मक राहण्यासाठी आम्ही तुमच्या साठी काही खास सुविचार घेऊन आलो आहे.


  • शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.

  • स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.

  • जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. 
आयुष्यात सकारात्मक राहण्यासाठी आम्ही तुमच्या साठी काही खास सुविचार घेऊन आलो आहे.

  • इतराशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.

  • जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.

  • काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता. त्यात सर्वोच्चस्थानी पोहोचा.

  • आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे.

  • घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.

  • आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.

  • चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.

  • जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं असं काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे काहीच केले नाही असं काही तरी करण्याची तयारी ठेवा.

  • बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वत:चं मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाहीत.

  • त्या शिक्षणाचा काय उपयोग जे शिक्षण घेऊनही माणसं कचरा रस्त्यावर टाकतात आणि तोच कचरा रोज सकाळी न शिकलेली माणसं उचलतात.

MavericK Sage

Myself MavericK, a College Student, Blogger | Programmer | Web Developer

Post a Comment

Previous Post Next Post