का कळेना तुला जीव राहवेना तुझ्याविना…!
ऋतू बदलले शिशिर सरला जीवा करमेना तुझ्याविना…!
वसंत येता आठवणींच्या झुल्यावर सये तुज स्मरताना…!
जसे वेणूचे स्वर मधुर मनी बोलताना…!
तुझे पैंजण जणू प्रितस्वर संगीत झंकारताना…!
आठवतेस तू मज क्षणाक्षणाला…!
सये काय म्हणावे तुझ्या आठवणींना…!
का कळेना तुला जीव राहवेना तुझ्याविना…!!
तु तुझं रूप जणू चंद्राची चांदणी…!
शिवाची शिवानी तू माझी प्रित साजणी…!
मन बावरे शोधे तुला स्वप्नी-मनी …!!
साद घालतो हा प्रियकर तुजला होशील का माझी प्रित रागिणी…!
का कळेना तुला जीव राहवेना तुझ्याविना…!
लोक म्हणतात असावा प्रेमात प्रामाणिकपणा…!
काय सांगू सये माझ्या प्रेमाचा स्वार्थीपणा…!
तू मिळाविस म्हणून करतो एक धरती-गगना…!
येशील ना सये माझीया मिलना…!
का कळेना तुला जीव राहवेना तुझ्याविना…!
✍️ वर्षा