कोणत्या शब्दात सांगू मी तुला
तू माझ्यासाठी कोण आहेस
गोड मधूर स्वप्नं कधी सत्य मधू मकरंद
ते स्वप्नं ही तू सत्य ही माझे तुच आहेस.
साखरझोपी गालावरी खळी पडते त्या
मिटलेल्या डोळ्यांतील स्वप्नं तू आहेस.
फुला पानांत दवांत धुक्यात तुला पाहते
क्षणो क्षणी होणारा आभास तुच आहेस
पोर्णिमेतील निरभ्र चंद्र ही लाजावा असे
खळखळणारे निखळ हास्य तू आहेस.
खरच कोणत्या शब्दांत सांगू तुला
माझ्यासाठी तू कोण आहेस
आस तू भास तू सर्वस्व तू
माझा आहेस रे तू!
✍ जन्मिता
Mast😍
ReplyDeleteKhoop chhan😍🔥
ReplyDelete