वय वाढेल तस..आपण विसरतो..स्वत:लाच, नि अमुल्य आनंद देणा-या व एकेकाळी मनमुराद जगुन घेतलेल्या कित्येक क्षणांना चक्क स्मृतीभ्रंश झाल्यासारखे आपण विसरतो. आपण चहा बशीत ओतुन फुर्रकन प्यायला विसरतो, ब-याचदा 'बीझी' शेड्युलमधुन सेकंदभरासाठी का होईना आईला कडकडुन मायेची मिठी मारायला विसरतो,आपण विसरतो, आपला शाळा कॉलेजमधला फिल्मी स्टार क्रश ज्यांच फोटो कलेक्शन आपल्या नोट्समध्ये लपवुन चोरुन पाहिल जायच.
आपण विसरतो खळखळुन, पोट धरुन लोळेतोवर हसायला, पटल तर टाळी द्यायला नाही पटल तर प्रेमानं हक्काची शिवी द्यायला..वय वाढत चालल की परिपक्वतेची आंधळी चादर ओढुन घेऊन त्यात स्वत:ला कोंडुन घेऊन मोकळा श्वास गुदमरला तरी चालेल म्हणुन तर आपण विसरतो,वरातीत, मिरवणुकीत बेभान होऊन नाचणं, धिंगाणा घालणं, मित्र मैत्रिणींच्या खांद्यावर हात टाकुन वाटेतला दगड घरगंळत, ऊडवत चालणं.आपण नक्कीच विसरतो मंदिरातली हाताला न येणारी घंटा ऊडी मारुन वाजवणं नि सिनेमात इमोशनल सीन आल्यावर तोंड लपवुन रडणं.
दुर्देवाने आपण एक गोष्ट कधीही विसरत नाही ती म्हंजे हे सगळ न विसरणा-यांना मैच्युरिटीच्या नावाखाली फिदीफिदी हसणं*