आईला बघण्यामध्ये वया नुसार मुलात होणारा बदल तो कसा पहा

आईला पाहिलं का . . . . 
आईला बघायचं आहे . . . . . 
आई कुठं गेली . . .
*वय - दोन वर्ष*

आई . . .कुठे आहेस ? ? 
मी शाळेत जाऊ . . . . .
अच्छा टाटा...
मला तुझी आठवण येते शाळेत
*वय - चार वर्ष* 


मम्मा . . . .
लव यू 
आज टिफिन मध्ये काय आहे ? 
आई आज शाळेत खूप गृहपाठ दिले आहे....
*वय - आठ वर्ष*

बाबा आई कुठे आहे ? ? ?
शाळेतून आल्यावर आई दिसली नाही तर कसं तरी होतं
*वय - बारा वर्षे*

आई बसना जवळ खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी
*वय - चौदा वर्ष*

काय ग आई समझ ना . . .
बाबांशी बोलना मला पार्टीत जाउ दे म्हणून
*वय - आठरा वर्ष*

काय आई . . . . बदलते आहे
तुला काही कळत नाही तू समजत नाही
*वय - बावीस वर्षे*

आई . . . आई. . 
जेंव्हा बघावे तेंव्हा काय शिकवत असतेस मी काय लहान बाळ आहे का
*वय - पंचवीस वर्षे*

आई . . . . ती माझी पत्नी आहे 
तू समजून घेना . . . 
तू तुझी मानसिकता बदल
*वय - अठावीस वर्षे*

आई . . . . ती पण एक आई आहे तिला तिच्या मुलांना सांभाळता येते तू प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करू नकोस
*वय - तीस वर्ष*

आणि त्या नंतर . . . . 
आईला कधी विचारलं नाही . . 
आई कधी म्हातारी झाली त्याला कळलंच नाही

आई तर आजपण तीच आहे . . 
फक्त वयानुसार मुलांचं वागणं बदलत गेलं . . 

नंतर एक दिवस. . . . . 
आई . . . आई . . . . . गप्प का आहेस? ? ? ? बोल ना . . . 
पण आई नाही बोलत. . . . 
कारण ती कायमची गप्प झाली होती
*वय - पन्नास वर्षे*

ती भाबडी आई. . .दोन वर्षांपासून पन्नास वर्षा पर्यंत हा बदलावं समजू शकली नाही . . 
करण आईसाठी पन्नास वर्षाचा प्रौढ पण लहानच आहे . . . . ती बिचारी तर शेवट पर्यंत प्रौढ मुलाच्या लहान सहान आजारांवर पण तशीच तळमळते जशी तळमळ त्याच्या लहानपणी असायची....

आणि मुलगा...आई गेल्यावरच समजतो की त्याने कोणता अमूल्य खजिना गमावलं आहे...... 😔😢😔😢

वयोमानाने बडबडणारे आई- बाबा समजून घेता आले तर बघा.... एवढ जमलं तरी तुम्ही सुशिक्षित झालात असं समजा.... नसता तुमच्या ढिगभर डिग्र्या काही कामाच्या नाहीत. 

आई बाबांची सेवा करा.... सेवा जमत नसेल तर केवळ आदर करा तो ही पुरेसा आहे त्या माऊलींना.... 
त्यांच्यासारखे दैवत नाही

*आपण ना जन्मदाता ब्रह्मा पाहीला,*
*ना आपण पोषण करता विष्णु पाहीला.*
*ना आपण दु:खाचा अंत करणारा शंकर पाहीला*

*पण हे तिन्ही गुण ज्यांच्यात आहेत ते नक्कीच आज जवळ आहेत त्यांची सेवा करा*

आणि एक विनंती प्रत्येकाने ही पोस्ट नक्की शेअर करा ह्यामुळे कोणाला तरी ह्या मोठेपणात विसरलेल्या आईची पुन्हा एकदा जाणीव होऊन जाईल...ते ही तुमच्यामुळे...
या खोट्या झगमगाटात ,त्या आलीशान बंगल्यात तेव्हढ सुख नाही जेव्हढं आईच्या कुशीत असतं .
देवा कडे काही मागायचं झाल्यास तिच्या मनोकामना पुर्ण कर म्हणा त्या देवाला तुमच्याच मनोकामना पुर्ण होतील कारण ती देवाकडे तुमचेच सुख मागत असते.
*आई म्हणजे आईचं असते ...!!!*😊🙏🏻🙏🏻

                                                          📝 वर्षा बनकर
MavericK Sage

Myself MavericK, a College Student, Blogger | Programmer | Web Developer

Post a Comment

Previous Post Next Post