जीवनात प्रगती करण्यासाठी, स्वतःच्या विकासासाठी ध्येय असणे गरजेचे आहे

प्रत्येकांच्या जीवनात ध्येय/उद्देश (Goal) हा असायलाच हवा. उद्देशहिन /ध्येयहिन जीवनात फक्त भटकंती असते. ह्याला आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया, समजा तुम्ही एका रेल्वे स्थानकावर गेलात व तेथे टिकीट खिडकीत जाऊन म्हटलात की एक टिकीट द्या तर तुम्हाला विचारले जाईल की कुठल्या स्थानकापर्यंतच पाहिजे आणि तुम्ही म्हणालात की कुठल्याही स्थानाचे द्या तर तुम्हाला कदाचित प्लॅटफार्मचं तिकीट देईल किंवा तेथील लोक मुर्खात पण काढेल.

ध्येयहिन जीवन हे असच असते. आपण कुठेच जाणार नाही व लोक आपलीच गंमत उडवतील. म्हणुनच जीवनात प्रगती करण्यासाठी, स्वतःच्या विकासासाठी ध्येय असणे गरजेचे आहे.

ध्येय निश्चित (Goal Setting) करण्यासाठी आधी स्वतःचं विश्लेषण केलं पाहिजे, जे तुम्ही SWOT Analysis वापरून स्वतः ची /व्यवसायाची विश्लेषण केलेले असणारच.

आपल्यापैकी बर्याच लोकांनी शाळेत असताना एक गाणं ऐकलं व गायलं पण असेल ‘ हम होंगे कामियाब एक दिन…..’ व हे गाणं ऐकत-गात १० वी, १२ वी व नंतर पदवी पण झाली आणि काही कामाला लागलो पण मनात एकच ‘ हम होंगे कामियाब एक दिन…’ पण कधी…? तो एक दिवस कधी येणार…? कधी विचार केलात? काही ध्येय निश्चित केलात?

ध्येय निश्चित करताना पुढील काही गोष्टींचा समावेश केलात ते ध्येय गाठण्यासाठी त्याच्या आराखडा तयार करण्यासाठी नक्कीच मदत होईल:

ध्येय हे नेहमी ‘SMART’ या पद्धती वर आधारित असायला हवे.

SMART ध्येय म्हणजे –
S – Specific (सुस्पष्ट ध्येय)
M – Measurable (मोजता येतील असा)
A – Achievable (गाठता/प्राप्त करता येईल असा)
R – Realistic (वास्तविक)
T – Time Bound (वेळेचं बंधन असणारं)

सुस्पष्ट ध्येय म्हणजे, जसं की ‘मी पुढील दोन वर्षात माझ्या व्यवसायातून वार्षिक सहा लाख रुपयांची कमाई करणार’

मोजण्यायोग्य म्हणजे तुम्ही वरील ध्येय गाठत असताना वार्षिक, सहामाही, त्रमाहीक किंवा मासिक प्रमाणे प्रगती मोजू शकता.
प्राप्त करण्यायोग्य म्हणजे तुम्ही जे ध्येय निश्चित केले आहे ते तुम्ही प्राप्त होईल असं ठरवलं आहे की उगाच अवाढव्य घेतलं आहे.
वास्तविक म्हणजे तुम्ही ध्येय गाठण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत व ते तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी साजेसे आहेत काय.

वेळेची बंधन असणारी म्हणजे तुम्ही ठरवलेलं ध्येय हे किती कालावधीत पूर्ण करणार.

जे ध्येय /उद्देश प्राप्त करण्यासाठी निश्चित वेळ बंधन नसते ते फक्त इच्छा असते, ते ध्येय असूच शकत नाही.

तर मित्रांनो, आजच्या माझ्या लेखनाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा करतो व तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी शुभेच्छा देतो.

शिकत रहा…. प्रगती करत रहा!
MavericK Sage

Myself MavericK, a College Student, Blogger | Programmer | Web Developer

Post a Comment

Previous Post Next Post