✒️हे आयुष्या......
हे आयुष्या तू माझ्या
नको जावू असा लांब,
जगण्याचा हक्क आहे मला
मनसोक्त जगू दे ना थांब...
तू धाव-धाव धावतोस
मागे वळून एकदा तरी बघ,
हासत्या खेळत्या आयुष्याला
गरिबीची लागलीय धग...
बाप थकला रे माझा आता
आधाराची काठी मला होऊ दे,
पाणीदार डोळ्यात त्याच्या
मनातील भावना एकदा वाचू दे...
अरे दोस्तांसोबत हसणं-खेळणं
आजून खूप बाकी राहिलंय,
करू दे आता स्वप्न साकार
जे एकमेकांच्या साथीनं पाहिलंय....
गुंतले मी भावंडात माझ्या
वाकूल्या नको रे दाखवू,
दगाफटका करून निर्दयीपणे
मृत्यूसमोर नको मला तू झुकवू ..
आठवून देतोस माझे उरले दिवस
कुशीत आईच्या भीती नाही कशाची,
पांग फेडायचे आहेत जन्मदात्यांचे
सोड आशा मला घेऊन जाण्याची....
हार नाहीच मानणार मी कधी
नियतीपुढं स्वतःला टिकवणार,
पडलेली काळाची सावली
अस्तित्व जपण्यासाठी मिटवणार..
📝कु. अश्विनी