वडिलांची जागा कोणालाही घेता येत नाही...*
*👉🏻 म्हणूनच वडिलांच्या रागाला सहन करायला शिका,तरच तुम्ही लायक व्हाल..*
*•》》 कोण्या बाहेरच्यांचे ऐकून घेण्यापेक्षा वडिल जे सांगतील ते शांतपणे ऐका.*
*•》》 वडिलांच्या समोर आवाज वाढवून बोलू नका....*
*•》》 वडिलांचा आदर करा..त्यामुळे तुमची मुलं तुमचा आदर करतील..*
*•》》 वडिलांचा सन्मान करा,यातच तुमचे भले होणार...*
*•》》 वडिलांचे म्हणणे ऐका,तुम्ही नक्कीच खुश रहाल..*
*•》》 वडिलांच्या समोर तुमची नजर झुकवून बोला....*
*•》》 वडील म्हणजे एक पुस्तक आहेत ज्यामध्ये अनुभव लिहिले जातात..*
*•》》 वडिलांचे अश्रू तूमच्या समोर वाहू देऊ नका....*
*वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असं व्यक्तिमत्त्व आहे की ते कोणत्याही मापात मोजता येणार नाही ... आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही..पण बाप तो बापच असतो..*
*आईच्या पायाखाली स्वर्ग आहे... पण बाप त्या स्वर्गाचे दरवाजे असतो.*
*विचार करा हे दरवाजेच उघडले नाहीत तर स्वर्गात प्रवेश कसा मिळवाल..*
*बाप मग तो शिक्षित असो वा अडाणी,ज्याला उन्हातान्हात सुद्धा मुलांच्या जीवनाचे कल्याण करण्याची काळजी असते...तुम्ही स्थिरस्थावर झाल्याशिवाय बापाला चैन पडत नाही...*
*बाप असो वा वडील...तो रागीट असो वा व्यसनी पण आपल्या मुलांना प्रेम करण्यात तो कधीच कमी पडत नाही...*
*रागावलेला बाप शांत झाला की त्याचा जीव मुलाला पाहण्यासाठी कासावीस होतो...हे बाप झाल्याशिवाय कळतच नाही..*
*लक्षात ठेवा सूर्य आगीचा गोळा आहे,धगधगता अग्नी आहे..पण मावळला की सर्वत्र अंधार आहे..*
*म्हणूनच म्हणतो,, बाप बाप असतो...आई सारखंच बापाची जागा सुद्धा कोणालाही घेता येत नाही...मन दडपून मुलांना सुखात ठेवण्यासाठी वरून आनंदित आणि हृदय पिळवटून रडणारा बाप कोणालाही कळणार नाही...*
*ज्याने बापाचे काळीज दुखावले तो आयुष्यात कधीच हसत नाही...*
*आणि ज्याने बापाला आयुष्यभर आदराने वागवले तो आयुष्याला दोष देत कधी रडणार नाही..*
_आपले वडिलांना मान सन्मान देऊन बघा ...आयुष्यात कधी काहीच कमी पडणार नाही...!_