जगणं असह्य होतं.....

हो तेव्हा जगणं असह्य होतं
जेव्हा आपलीच नाती आपल्यालाच खायला उठतात.
ज्या पाण्यात आपण त्यांना पोहायला शिकवलं त्याच पाण्यात आपल्याला डुंबवून नाका तोंडात पाणी घालतात.
तेव्हा जगणं असह्य होतं.

आपल्या नात्यानं प्रेमाने जगवायचं
काट्यांच्या जगात त्यांना फुलांप्रमाने टवटवीत ठेवायचं
त्यांना उन्हाची झळा अन वाऱ्यांचा पात्यांची जाणीव सुद्धा होऊ द्यायची नाही 
पण जेव्हा तेच नाते आपल्या जीवावर उठते.
तेव्हा जगणं असह्य होतं.
जेव्हा आपल्या काळजीच्या स्वरांच रूपांतर त्यांच्या रागाच्या ओरडण्यात होते .
तेव्हा जगणं असह्य होतं.
जेव्हा त्यांच्या दुःखावर आपण पांघरून घालतो आणि त्याची परतफेड ते आपल्या दुःखावर हसून करतातं 
तेव्हा जगणं असह्य होतं.

किती मस्त जोपासल्या गेली असती नाती जर त्याची मालकी फक्त एका व्यक्तीकडे असती.
प्रेम मिळालं नाही तरी तिरस्कार तरी नसता....
पण हे शक्य नाही असं लक्षात आल्यावर मात्र 
जगणं असह्य होतं.

जेव्हा मन आकांताने रडतं पण अश्रू सुद्धा ओघळत नाही 
तेव्हा जगणं असह्य होतं.
जेव्हा मिणमिणत्या थकलेल्या पापण्या पुन्हा उघडाव्या लागतात. 
तेव्हा जगणं असह्य होतं,
जेव्हा माहिती असतं की पुन्हा पुन्हा हेच घडणार आहे 
प्रेमाचा मोबदला फक्त तिरस्कारच मिळणार आहे.
आणि तरीही नात्यांची जाण ठेवून प्रेम करायला तयार व्हावं लागतं 
तेव्हा जगणं असह्य होतं.
तेव्हा जगणं असह्य होतं
MavericK Sage

Myself MavericK, a College Student, Blogger | Programmer | Web Developer

Post a Comment

Previous Post Next Post